तोडफोडप्रकरणी 5 जणांना अटक

पिंपरी – किरकोळ कारणावरुन जमाव जमवून चौघांनी ट्रक चालकाला मारहाण करत पाच ट्रकची तोडफोड केल्याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

अमित प्रकाश बाबर (वय-35, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार फरदीन बाबर शेख (वय-19, रा. दत्तनगर, चिंचवड), सागर झोरबाडे (वय-21, रा. शंकरनगर, चिंचवड), सुग्रीव काळे, अजय बारसकर (वय-22, रा.चिंचवड), दीपक गिरी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना का बोलावले अशी विचारणा करत जमावाने ट्रक चालक राजेश कुमार सॉंह (वय-24, रा. चिंचवड), परमेश्‍वर श्रीत्मल सॉंव (वय-20) यांना लाकडी दांडक्‍याने व दगडाने मारहाण करत पाच ट्रकची तोडफोड केली होती. सहायक पोलीस निरीक्षक पी. डी. आरदवाड तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)