तोडफोडप्रकरणी तिघांना अटक, जामीन

पुणे – आंदोलनासाठी परवानगी न घेता वस्तू आणि बाटल्यांची तोडफोड केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या तिघांना अटक केली आहे. तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.

प्रशांत लालसिंग धुमाळ (36, रा. शिवाजीनगर गावठाण), संतोष बालाजी शिंदे (36, रा. पार्थ कॉम्प्लेक्‍स, नवी पेठ) आणि सचिन विठ्ठलराव आडेकर (43, रा. मल्हार, वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पी. पी. अहिरे यांनी फिर्याद दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील लॉन टेनिसच्या स्टेडीएमच्या गेट समोर आंदोलन करून घोषणाबाजी करत प्रदर्शनाच्या स्टॉलमधील वस्तुंची व बाटल्यांची तोडफोड केली. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना येण्यास अडथळा निर्माण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. मिलिंद पवार आणि ऍड. भालचंद्र पवार यांनी केलेल्या युक्तीवादामुळे जामीन मंजूर करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)