तोंडोळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशाबाई पडळकर 

पाथर्डी – तालुक्‍यातील तोंडोळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशाबाई बाळासाहेब पडळकर यांची बिनविरोध निवड झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी राजेंद्र मुळे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक अमोल पवार व कामगार तलाठी पुष्पलता बडे यांनी सहकार्य केले. सरपंचपदाच्या निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सरपंचपदासाठी आशाबाई पडळकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य नितीन वारुंगळे, सावित्राबाई वारुंगळे, उषा आठरे, सविता वारुंगळे आदी ग्रामपंचायत सदस्य हजर होते. आशाबाई पडळकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत व फटाके फोडून आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ नेते रामकिसन भिसे, कैलास वारुंगळे, ज्ञानदेव पडळकर, बबन आठरे, सावळेराम पडळकर, भिमराज पडळकर, अनिल पडळकर, ज्ञानेश्‍वर वारुंगळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)