तोंडोळीचे आरोग्य उपकेंद्र “असून अडचण नसून खोळंबा’

कोरडगाव – पाथर्डी तालुक्‍यातील दुर्गम भागातील कोंडोळी, दैत्यनांदूर, सोनोशी, कळमपिंप्री गावासाठी आरोग्य खात्याचे एक आरोग्य उपकेंद्र आहे. त्याची सुसज्ज इमारत आहे. त्यामध्ये सर्व सोयीसुविधा असताना ते आरोग्य केंद्र केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. सध्या तरी येथील आरोग्य केंद्र लोकांसाठी “असून अडचण नसून खोळंबा’ असे झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाथर्डी तालुक्‍यामध्ये तोंडोळी येथील आरोग्य उपकेंद्र असून ते कायमस्वरूपी बंदच दिसते. परंतु, सर्व रेकॉर्ड या भागातील पुढाऱ्यांना चिरीमिरी देऊन पूर्ण केले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या ठिकाणी आरोग्य सहायक, परिचारिका आहेत. त्या कधीतरी आरोग्य केंद्र उघडतात. इतर दिवशी गावातील काही निरक्षर व्यक्‍तींकडे उपकेंद्राच्या चाव्या दिल्या जातात. त्याला महिन्याकाठी 2 हजार रुपये पगार दिला जातो. दवाखान्यातून अनेकदा रुग्णाला चुकीच्या गोळ्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. हे झाले फक्‍त तोंडोळी गावाचे चित्र. परंतु, कळसपिंप्री, दैत्यनांदूर, सोनोशी गावाचे काय? त्या ठिकाणी डॉक्‍टर फिरकत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)