पुणे- रिक्षामधून प्रवास करत असलेल्या महिलेच्या तोंडासमोर रुमाल फडकवून त्याव्दारे महिलेचा स्मृतीभ्रंश केला. यानंतर तिच्या बॅगमध्ये असलेली रोख रक्कम व सोन्याचे दागीने असा एकूण 91 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आशा पाटील (55, रा. करमाळा, जि. सोलापूर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हडपसर, गाडीतळ रिक्षा स्टॅण्ड ते भेकराई नगर असा प्रवास रिक्षातून करत होती. यावेळी रिक्षामध्ये तिघे सहप्रवासी होते. यातील एकाने प्रवासादरम्यान महिलेच्या तोंडावर रुमाल फडकवून तिचा स्मृतीभ्रंश केला. त्यानंतर महिलेच्या बॅगमधील रोख रक्कम 85 हजार व 6 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागीने घेऊन पसार झाला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कामथे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)