तोंडाने विविध वाद्य लिलया वाजविणारा अवलिया

राज्यभरात 300 प्रयोग : जिद्दीतून केला प्रवास

पिंपरी – लहानपणापासूनच कलेची आवड, जेमतेम परिस्थिती मात्र कष्टाशिवाय यश मिळत नाही हे सिद्ध करून दाखवायचे आहे, अशी जिद्द. निगडीतील त्रिवेणीनगर येथील सतीश परदेशी या कलाकाराची. त्याने तोंडाने वाद्य वाजवून विविध गाण्यांना स्वर दिले आहेत. राज्यभरात 300 हून अधिक प्रयोग केले आहेत.

शाळेत असतानाच वार्षिक स्नेहसंमेलनातून अशी वाद्य वाजविण्याची आवड परदेशी यांना निर्माण झाली. रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयात शिक्षण पूर्ण झालेल्या विविध छोट्या मोठ्या संस्थामध्ये काम करून शिकल्याचा जास्त फायदा वाद्य वाजविण्यास झाला. विविध नाटक व चित्रपटांना पार्श्‍वसंगीत दिल्याने कामाची ओढी वाढत गेली. परदेशी यांनी विविध नाटक व एकांकिका ठिकटिकाणी सादर केल्या आहेत. तसेच नुकतेच रशियन कलाकरांसमवेत सिनेमाचे काम केले आहे. त्यामुळे विदेशी कलाकारांसोबत काम करण्याचा आनंद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

तोंडाच्या माध्यमातून संगीत देवून त्यांनी विविध गाणी सादर केली. त्यामध्ये रुपेरी वाळूत माडाच्या बनात…, यमुनेच्या तीरी मी पाहिला हरी…, क्‍या यही प्यार है…, मी मराठी… मी मराठी…, अशी विविध प्रकारच्या गाण्यांना संगीत दिले आहे. त्यामध्ये मुख्य पाच प्रकारची वाद्य त्यांनी वाजविली. ती म्हणजे, ढोलकी, तुणतुणे, गिटार, खंजिरी, डफ, इनसेट अशी वाद्य वाजविली जातात.

राज्यभरात अमरावती, औरंगबाद, परभणी, मुंबई, पुणे अशा ठिकठिकाणी विविध स्तरावर प्रयोग सादर केले आहेत. तोंडाने वाद्य वाजवायला देखील खूप मेहनत लागते. उपाशी पोटी हे वाद्य वाजवावी लागतात. त्यासाठी सोबतीला संगीताची साथ देणारा जोडीदार असावा लागतो. तसेच एखाद्या विनोदी कलाकाराची साथ असावी लागते. लोकांना कलेची किंमत कळत नाही. मात्र यामाध्यमातून आर्थिक मदत होते. तुटपुंजे मानधन मिळते. यासाठी सराव देखील खूप लागतो. त्यामुळे प्रयोग सादर करताना तारेवरची कसरत करावी लागते.

तारेला जसा ताण दिला जातो, तसा तसा स्वर बदलत जातो. तसा आवाज तोंडातून मी काढतो. ढोलकीला तर प्रेक्षक टाळ्यांच्या माध्यमातून दाद देतात. पहिल्यांदा प्राण्यांचे आवाज काढत असायचो. त्यातून पुढे सराव करत गेलो. शहरभरातून अशा विविध कला सादर करणाऱ्यांना एकत्र आणायचे आहे. कोणत्याही वाद्याचा वापर न करता तोंडाने वाद्य वाजवून दाखविणाऱ्यांचाच ग्रुप तयार करून प्रयोग करायचे आहेत. व्यक्तीमधील कलागुणांना वाव मिळायला हवा. यातूनच तोंडाद्वारे संगीताची कास धरून पुढे यशस्वी वाटचाल करायची आहे.
– सतीश परदेशी, कलाकार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)