तोंडात गांधी नाम आणि वृती जुलमी ब्रिटीशांची ! काँग्रेसची भाजपवर टीका

वर्धा: संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांसाठी पेन्शन, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी, तीन प्रमुख मागण्यासह विविध मागण्यासाठी हजारोच्या संख्येने शेतकरी मंगळवारी किसन क्रांती पदयात्रा करत हरिव्दारहून दिल्लीत पोहचले.

राजधानी दिल्लीच्या शहराच्या वेशीजवळ शेतकऱ्यांना प्रवेश न करू दिल्याने यूपी बाॅर्डर पोलीस आणि शेतकरी याच्यांत संघर्ष झाला. पोलीस आक्रमक झाल्याने या पदययात्रेला हिसंक वळण लागले. पोलीसांनी शेतकऱ्यांना थांबविण्यासाठी पदयात्रेवर पाण्याचे फवारे साेडले. तसेच आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज सुध्दा करण्यात आला.

-Ads-

दरम्यान, आज काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल करत, “मोठ्या उद्योगपतींचे लाखो कोटींचं कर्ज माफ करणाऱ्या मोदी सरकारने गरीब मोर्चेकरी शेतकऱ्यांवर हिंसेचे प्रयोग करून दिल्लीत १५०वी गांधी जयंती केली साजरी” अशी कणखर टीका केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)