तोंडल येथे महिलांचा युवकांना चोप

शिरवळ – तोंडल, ता. खंडाळा येथील स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्याचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधितांना विचारणा करायला गेलेल्या महिलांना तेथील ठेकेदाराने पोसलेल्या युवकांनी दमदाटी करण्याचा प्रकार केला. त्यानंतर संतापलेल्या महिलांनी संबंधित युवकांना चांगलाच हिसका दाखवत चोप दिला. महिलांचे उग्र रुप पाहून संबंधित युवकांनी पोबारा केला. दरम्यान, यावेळी संबंधित युवकांकडे तलवार व चाकूसारखी धारदार शस्त्रे महिलांना आढळून आली असून पोलिसांनी ही धारदार शस्त्रे ताब्यात घेतली असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, नीरा नदीमध्ये मच्छिमारीच्या ठेक्‍याच्या प्रश्‍नावरुन ठेकेदार व स्थानिक मच्छिमार यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. मंगळवारी, 18 रोजी सकाळी तोंडल ता. खंडाळा गावच्या हद्दीत नीरा नदीमध्ये तोंडल येथील स्थानिक मच्छिमारांनी टाकलेल्या जाळ्या ठेकेदारांच्या व्यक्तींनी नदीमधून काढून फाडून टाकल्या. यावेळी स्थानिक मच्छिमार महिला याबाबत विचारणा करायला गेल्या असता त्यांनाच संबंधितांनी दमदाटी केल्याचा आरोप करत महिलांनी उग्ररूप धारण करत संबंधितांना चोप देत त्याठिकाणी असणाऱ्या केबिनची, खुर्च्यांची,साहित्याची तोडफोड केली. यावेळी महिलांचा आवेश पाहून संबंधित युवकांनी घटनास्थळावरुन पलायन केले. घटनास्थळी आलेल्या शिरवळ पोलिसांनी घटनास्थळावरुन तलवार ताब्यात घेतली असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिरवळ पोलीस स्टेशन याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक मच्छिमार महिलांसह नागरिकांनी गर्दी केल्याने वातावरण तप्त झाले होते. याबाबत रात्री उशिरापर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)