तोंडल गावच्या सरपंचपदी सखूबाई वणवे

गराडे – तोंडल (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच रतन विलास साबळे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता.रिक्त झालेल्या सरपंचपदी सखूबाई बाळासाहेब वणवे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी भरत भिसे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक अनिल खळदकर हे निवडणूक सहाय्यक होते. निवडणुक प्रक्रियेप्रसंगी सरपंच पदासाठी एकच अर्ज आला. त्यामुळे सखूबाई वणवे यांची बिनविरोध निवडीची घोषणा भरत भिसे यांनी केली. या वेळी उपसरपंच रामभाऊ नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य संजय वणवे, कमल नागरगोजे, कमल नागरे, आश्रु वणवे उपस्थित होते. यावेळी गावकारभारी मोहन मोरे, बापूसाहेब वणवे, बाळासाहेब बाबर, शाम वणवे, सदाशिव वणवे, बाळासाहेब वणवे, दिगंबर वणवे, प्रकाश वणवे, धनंजय साबळे आदीसह तोंडलकर ग्रामस्थ उपस्थित होते. तोंडल गावातील विकासकामांना निधी उपलब्ध करुन सर्व कामे जलदगतीने करणार असल्याचे सरपंच सखूबाई वणवे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)