तोंडओळखीच्या मित्राने केला दगाफटका

– लॅपटॉप, घड्याळ, मोबाईल लंपास

पिंपरी – अहमदाबाद मधील उच्चशिक्षित तरुणाचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि घड्याळ असलेली बॅग त्याच्या तोंड ओळखीच्या मित्राने लंपास केली. ही घटना शनिवारी (दि. 24) दुपारी साडेपाचच्या सुमारास चिंचवड मधील अहिंसा चौकातील कामिनी हॉटेलमध्ये घडली.

धीरज रामकिशन अजमीर (वय-19, सध्या रा. सीओरा विस्टा, वीरभद्रा नगर, बाणेर) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, श्रीकांत चौधरी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धीरज मूळचे अहमदाबाद येथील आहेत. त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण सुरु आहे. मागील सहा महिन्यांपूर्वी त्यांची ओळख आरोपी श्रीकांत याच्याशी झाली. शनिवारी दुपारी धीरज अहमदाबाद वरून पुण्याला आले. त्यावेळी त्यांना घेण्यासाठी श्रीकांत पुणे विमानतळावर गेला. त्यांना घेऊन तो चिंचवड मधील कामिनी हॉटेल येथे आला.

हॉटेलमधील रूममध्ये पोहोचल्यानंतर श्रीकांत याने त्याला इ-मेल करण्यासाठी धीरज यांचा लॅपटॉप हवा असल्याचे सांगितले. धीरज यांनी लॅपटॉप बॅग श्रीकांत याच्याकडे दिली आणि ते फ्रेश होण्यासाठी गेले. या संधीचा फायदा घेत श्रीकांत याने लॅपटॉप, मोबाईल फोन आणि घड्याळ असा एकूण 85 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. धीरज फ्रेश होऊन आल्यानंतर रूममध्ये बघितले असता श्रीकांत आणि त्यांचे सामान दोन्ही गायब होते. चिंचवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)