तैवानच्या माजी अध्यक्षांना 4 महिन्यांचा तुरुंगावास

तैपेई  : गोपनीय माहिती उघड करण्याप्रकरणी तैवानच्या न्यायालयाने माजी अध्यक्ष मा यिंग-जीऊ यांना दोषी ठरविले आहे. उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत मा यांना सुरक्षा आणि देखरेख अधिनियमाचे उल्लंघन करण्यासाठी 4 महिन्यांची शिक्षा ठोठावली.

कनिष्ठ न्यायालयाने मा यांना निर्दोष ठरविले होते. शिक्षेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे विधान मा यांनी केले. वैयक्तिक डाटा संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करणे आणि राष्ट्रपतिपदाच्या अधिकारांचा दुरुपयोग करण्याप्रकरणी मा यांना दोषी ठरवण्यात आले आहे. मा यांनी विरोधी पक्षाचे खासदार केर चिएन-मिंग यांच्या प्रतिमेला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. केर यांच्याशी संबंधित एका प्रकरणाच्या चौकशीची गोपनीय माहिती त्यांनी उघड केली होती. माहिती प्राप्त करण्यासाठी केर यांचे फोन टॅप केल्याचा आरोप तपासकर्त्यांवर झाला होता. कार्यालयाच्या माध्यमातून प्राप्त माहिती गुप्त ठेवणे आवश्यक होते असे न्यायालयाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)