तैमूरच्या एका फोटोची किंमत तुम्हाला माहितीये का?

सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो. सध्याच्या स्टार किड्‌सपैकी तैमूर हा सर्वाधिक प्रसिद्धच्या झोतात असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कमी वयातच स्टार बनलेल्या छोटया तैमूरचे फोटो सातत्याने इंटरनेटवर व्हायरल होत असतात. परंतु, तैमूरच्या एका फोटोची किंमत किती असते माहिती आहे का? याच प्रश्नाचा खुलासा स्वतः सैफ अली खानने केला आहे.

‘कॉफी विथ करण’मध्ये सारा अली खानसोबत सैफने उपस्थिती लावली होती. यावेळी करण जोहरने तैमूरसंबंधी प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना सैफने सांगितले कि, सोशल मीडियावर तैमूरचे फोटो व्हायरल होतात. त्याची किंमत १५०० रुपये प्रतिफोटो असते. यासंबंधीची माहिती सैफला रणधीर कपूर यांनी दिली होती. हे ऐकून मीही आश्चर्यचकित झालो होतो, असे त्याने सांगितले.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)