पुणे: ‘ते’ सिलिंडर विक्रेते रडारवर

file pic

महापालिकेने मागविली गॅस वितरकांची माहिती

पुणे – महापालिकेने अतिक्रमण कारवाईत अनेक सिलिंडर जप्त केले आहेत. यात महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र नसतानाही अनेक वितरकांनी अनधिकृतपणे सिलिंडर विक्री केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

शहरातील वितरक तसेच त्यांच्या गोडाऊनची माहिती महापालिकेने या गॅस कंपन्यांकडे पत्राद्वारे मागितली आहे. तसेच वितरकरांनी अशा प्रकारे गॅस सिलिंडर देऊ नयेत, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात अशी विनंतीही करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका शहर फेरीवाला धोरण-2013 ची अंमलबजावणी करत आहे. यानुसार पथ विक्रेत्यांना रस्त्यावर खाद्य पदार्थ शिजविण्यास बंदी आहे. मात्र, त्यानंतर अनेक विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून ते परवानगी न घेताच गॅस वितरकांकडून घेतल्याचे समोर आले आहे. असे सुमारे 1 हजारहून अधिक सिलिंडर पालिकेने जप्त केले असून ते अतिक्रमण विभागाच्या गोडाऊनमध्ये ठेवले आहेत. त्यामुळे पालिकेच्या गोडाऊनला आगीचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे सिलिंडर गॅस वितरकांकडे ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेने माहिती मागविली आहे. याशिवाय, या वितरकांकडे एकदा सिलिंडर दिले आणि त्यानंतर पुन्हा केलेल्या कारवाईत संबंधित वितरकाकडून सिलिंडर देण्यात असल्याचे आढळल्यास अशा वितरकरांवर थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)