“ते’ सर्व धर्म समभावाचे प्रतिक

  • हर्षवर्धन पाटील : मुस्लीम समाजासाठी अनेक कामे केली

निमसाखर – सर्व धर्म समभावचे प्रतिक असलेल्या हजरत ख्वाजा बंदे नवाज यासह अन्य ही धार्मीक शक्‍तीस्थळे आहेत. तालुक्‍यात मुस्लीम लग्न सोहळ्यासह अन्य अडीअडचणी सोडवण्यासाठी यापूर्वी आणि आत्ताही काम केले असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
निमसाखर येथील पीरसाहेब परिसरात गुलबर्गाचे ठाणे असलेले हजरत ख्वाजा बंदे नवाज उरुस आयोजनाचे चौथे वर्ष आहे. या दर्गासाठी येथील आयुब शेख यांच्या प्रयत्नातून या दर्गाचे काम केले. यावेळी संध्याकाळी हासीम भाई यांच्या कव्वालीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमापूर्वी मार्गदर्शन करण्यासाठी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील प्रमुख पाहुणे म्हणुन यावेळी उपस्थित होते. यावेळी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक रणजित रणवरे, माजी उपसभापती जयकुमार कारंडे, माजी सरपंच गोविंद रणवरे, अनिल बोंद्रे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मुलाणी, सुनिल मोरे, निमसाखर सोसायटीचे सदस्य मिरोशीन मुलाणी, वजीर मुलाणी, रशीद शेखसह नागरिक व अन्य समाजबांधव उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रुप धारण केले आहे. या भागातील शेतीला खात्याकडून पाण्याची गरज असून यासाठी 54 फाटा सोडण्यासाठी खात्याकडे आग्रह धरला आहे. याचबरोबर भयानता लक्षात घेता नीरा नदीत पाणी भांडून आणले असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते यावेळी हजरत ख्वाजा बंदे नवाज येथे चादर चढवुन मुस्लीम बांधवांनी फत्या फोडला (प्रार्थना केली). यावेळी शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागले असून “लवकर पाऊस पडु दे अन्‌ सरकारचे ही… डोके ठिकाणावर येऊ दे’ यासाठी प्रार्थना केली. चांगला पाऊस झाल्यासच शेतकऱ्यांची होरपळ थांबणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)