‘ते’ ट्वीट हे बनावट अकाऊंटवरुन केले ; हार्दिक पंड्याने दिले स्पष्टीकरण

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या आरोपांनंतर भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पंड्याने स्पष्टीकरण दिले आहे. हार्दिक पंड्याने याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

“डॉ. आंबेडकरांबद्दल मी कोणतीही अपमानजनक टिप्पणी केली नाही. संबंधित ट्वीट हे बनावट अकाऊंटवरुन केले असून, त्यामध्ये माझ्या नावाचा आणि फोटोचा चुकीचा वापर केला आहे,” असल्याचे पंड्याने स्पष्ट केले आहे. तसेच “माझ्या मनात बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाबद्दल नितांत आदर आणि सन्मान आहे,” असेही हार्दिक पंड्याने नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)