ते खासदार नसून खावदार आहेत- अनिल राठोड

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा खासदाराकडून निषेधही नाही
नगर – बॅंकेत खातो,इलेक्‍ट्रीक विभागात खातोय,एलईडी कंपनीही स्वताच्या मुलाची आहे. प्रत्येक ठिकाणी खाणारा खासदार नसुन खावदार असल्याची खरमरीत टिका शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत खासदास दिलीप गांधी विषयी केली. उध्दव ठाकरे यांनी नुकतीच केडगाव येथे शिवेसेनेच्या कार्यकर्त्यांची हत्या झालेल्या कुटूंबाना सांत्वनपर भेट दिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर खासदार दिलीप गांधी यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी नुकतीच शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, महापौर सुरेखाताई कदम, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक सचिन जाधव, संजय शेंडगे, विक्रम राठोड, सुरेश तिवारी, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना अनिल राठोड म्हणाले, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची केडगाव येथे हत्या झाली. या घटनेला वीस दिवस उलटूनही भाजपाकडून या हत्येचा निषेधही व्यक्त होत नाही. व वीस दिवसांनंतर खासदार शिवसेना पक्षप्रमुखांविषयी कसा काय बोलतोय? हा पोपट सुध्दा एक दिवस पिंजऱ्यात जाणार आहे. शिवसेना दहशत वादाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे. खासदारावर खंडणी ,अपहरण,अतिक्रमण असे अनेक गुन्हे आहेत. हा खासदार भाजपचा नसून हा तर स्थानिक राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाला पोसणारा राजकिय दलाल असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. ज्याला केडगाव पोट निवडणुकीत आपल्या उमेदवाराचे डिपॉझिट वाचवता आले नाही अशांनी प्रक्ष प्रमुखावर बोलू नये व तशी त्याची उंचीही नाही.भाजप वर आमची नाराजी नाही .आमची नाराजी खासदार गांधीवर आहे. खासदार गांधी म्हणजे गांधी या नावाला कलंक आहे. फेज टू च्या अर्धवट कामाबद्दल बोलतांना ते म्हणाले शिवसेनेच्या अगोदर ज्यांची महापालिकेत सत्ता होती .त्यांना हा प्रश्‍न विचारायची ताकद खासदाराची होती का? स्वताची लायकी नसतांनाही तीन वेळा खासदार झाले. शिवसेनेने मृत शिवसेनेच्या कुटूंबियांना 22 लाखापर्यंत अर्थिक मदत दिली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली .खासदाराला आम्ही भाजपचा मानतच नाही. ही खरी भाजप नसुन हा तर छिंदम गट असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांवर बोलू नये . असा इशाराही त्यांनी यावेळी दिला


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)