“ते’ आठ जण पुन्हा कॉंग्रेसमध्ये दिसतील

डॉ. सुजय विखे पाटील यांचा सावेडीतील सभेत सूचक इशारा

नगर – “शहराचे राजकारण महापालिका निवडणुकी-निमित्ताने पाहता आले.कपडे कधी काढून घेतील, हे देखील कळणार नाही, असं हे राजकारण आहे. केडगाव येथील कॉंग्रेसचे आठ जण तंबुतून निघून भाजपमध्ये कधी गेले हे देखील कळाले नाही. परंतु ते पुन्हा कॉंग्रेसमध्येच दिसतील,’ असा सूचक इशारा कॉंग्रेसचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाआघाडीच्या सभेत बोलताना दिला.

-Ads-

डॉ. विखे पाटील म्हणाले, “मला अनेक जण म्हणाले, की तुमचे इथे काय काम आहे? विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. आमदार बाळासाहेब थोरात राष्ट्रीय कॉंग्रेसचे सदस्य असल्याने ते देशाचे नेते आहेत. सत्यजित तांबे यांच्याकडे प्रदेश युवक कॉंग्रेसची जबाबदारी आहे. राहिलो मी, मोकळाच आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली आहे.’ केडगाव घटनेनंतर जे पक्ष सोडून गेले त्यांना जावून द्या, शिल्लक राहिलेल्या निष्ठावान यांना सोबत घेवून कॉंग्रेस निवडणूक रिंगणात असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.

जे सोडून गेले ते आठ पुन्हा कॉंग्रेसमध्येच येतील, अशीही आपण तयारी केली आहे, राजकारण आता बदलले आहे, हे सांगून ग्रामीण भागात राजकारणात दोन गट असते. मात्र, नगर शहरात कोण कोणासोबत आहेच काळत नाही, अशी टिपणी डॉ. विखे पाटील यांनी करताच सभेत हशा पिकला. आजोबा एका पक्षात, मुलगा दुसऱ्याच पक्षात, मुलगी तिसऱ्या पक्षात आणि सुन चौथ्या पक्षात असल्याचे येथे नगरमध्ये पाहायला मिळाले. निवडणुकीच्या तोंडावर केडगावातील माझ्यासोबत असणारे 8 उमदेवार भाजपने कधी काढून नेले हे देखील कळाले नाही. पण आपण कोणाच्या विरोधात एकही शब्द बोललो नाही. निवडणूक संपल्या की दोन महिन्यांनी हे सर्व नाते पक्ष सोडून एकत्र येतील आणि पुढील निवडणुकीत माझाच कार्यक्रम करतील, अशी भीती डॉ. विखे पाटील यांनी सभेत व्यक्त करताच सभेत पुन्हा हशा पिकला.

यामुळे मी गप्प राहणे पसंत केले आहे. पण जे आज कॉंग्रेससोडून भाजपमध्ये गेले आहेत, तसेच उद्या राष्ट्रवादीसोडून भाजपमध्ये जायला मागेपुढे पाहणार नाहीत. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दक्षता घ्यावी, असा सल्लाही डॉ. विखे पाटील यांनी यावेळी दिला. केडगावच्या घटनेने मी देखील सावध झालो असून नगरमध्ये सावधपणे काम करणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

What is your reaction?
51 :thumbsup:
7 :heart:
4 :joy:
5 :heart_eyes:
4 :blush:
3 :cry:
2 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)