…तेव्हा रिझर्व्ह बॅंक काय करीत होती 

कॅगचा सवाल; बॅंकांतील एनपीए व घोटाळ्यांना जबाबदार कोण? 
नवी दिल्ली: देशातील अनेक बॅंकांनी काही कंपन्यांना तारणापेक्षा जास्त कर्ज दिली. त्यामुळे कर्जवसुलीवर परिणाम होऊन बॅंकेची अनुत्पादक मालमत्ता वाढून बॅंकेचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. बॅंका असे कर्ज देत असताना नियंत्रक म्हणून रिजर्व्ह बॅंक काय करीत होती असा सवाल महालेखापालांनी म्हणजे कॅगने रिझर्व्ह बॅंकेला केला आहे.
गेल्या वर्षाच्या अखेरपर्यंत बॅंकाची अनुत्पादत मालमत्ता 9.61 लाख कोटी रुपयावर गेली आहे. आता आपण सगळेच बॅंकाना या परिस्थितीतून कसे बाहेर काढायचे याचा विचार करीत आहोत.
बॅंकांना भांडवल देण्याची भाषा केली जात आहे. ते पुन्हा करदात्यांकडून द्यायचे आहेत का, असा सवाल त्यांनी केला. अनुदानाबाबत नकारात्मक वातावरण असताना बॅंकांना भांडवली मदतीची भाषा केली जात आहे. मात्र मूळ प्रश्‍नावर कोणीच काही बोलत नाही. बॅंका असा व्यवहार अयोग्य पद्धतीने अनेक वर्षापासून करी असताना बॅंकांची नियंत्रक म्हणून रिझर्व्ह बॅंक काय करीत होती. यात रिझर्व्ह बॅंकेची भूमिका काय आहे, जबाबदारी काही आहे की नाही, याबाबत केणीच बोलताना दिसत नसल्याचे महालेखापाल राजीव महेरिसी यानी सांगितले.
एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, बॅंकांना आता अनुत्पादक मालमत्ता पेलेनाशी झाली आहे. त्याची जबाबदारी कोणाची आहे. त्यावर पारदर्शकपणे जाहीर चर्चा होण्याची गरज आहे. तरच त्यातून काही तरी मार्ग निघण्याची शक्‍यता निर्माण होईल. आताही या विषयावर चर्चा झाली तरच यातून काही यंत्रणा विकसित करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पायाभूत सुविधा क्षेत्राला दीर्घ मुदतीचे कर्ज हवे असते. यासाठीची कर्ज रोखे यंत्रणा भारतात विकसित झालेली नाही. त्यामुळे बॅंकांना तसे कर्ज द्यावे लागते. यातून सध्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे बॅंकाच्या मूळ कामावर परिणाम होत आहे.
ते म्हणाले की, बॅंकांनी फारसा विचार न करता कर्ज दिल्यामुळे अनुत्पादक मालमत्ता वाढली आहे. प्रश्‍न एवढ्यावरच थांबलेला नाही. तर बॅंकांत मोठे घोटाळे झाले आहेत. त्या घोटाळ्यात मोठी रक्कम अडकलेली आहे. त्याचाही बॅंकाच्या ताळेबंदावर आणि बॅंकाच्या विश्‍वासार्हतेवर परिणाम झालेला आहे. त्यातही रिझर्व्ह बॅंकेची नियंत्रक म्हणून काय भूमिका आहे यावारही फारशी गांभीर्याने चर्चा होतांना दिसत नाही. या विषयावर सर्वसमावेशक चर्चा झाल्यासच यातून मार्ग निघेल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)