…तेव्हाच होणार ऍबी व्हॅलीचा लिलाव?

जागेचा त्रुटी संदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासन देणार


एकूण 7 हजार एकर जागा; 346 हेक्‍टर जागा वन विभागाची

पुणे – सहारा ऍबी व्हॅली (ता. मुळशी) मधील जागेच्या संदर्भात विविध प्रकारच्या त्रुटी उपस्थित करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने वन विभागाची जागा, इनाम अथवा वतन जमिनींसाठी किती नजराणा भरावा लागेल, अनधिकृत बांधकामांचे काय होणार, व्हॅलीमधील हॉटेल व अन्य परवाने कायम राहणार का, या त्रुटींचा समावेश आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून एक अहवाल तयार करण्यात येणार असून तो उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. यासर्व त्रुटी आणि शकांचे समाधान झाल्यानंतर ऍबी व्हॅलीच्या लिलावाची प्रकिया पुढे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ऍबी व्हॅलीतही अनधिकृत बांधकामे
ऍबी व्हॅलीचा आराखडा (लेआऊट) हा 2007 मध्ये मंजूर करण्यात आला. आता ऍबी व्हॅलीत अनधिकृत बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. ऍबी व्हॅलीचा लिलाव झाल्यानंतर ही बांधकामे नियमित करण्यात येणार का? असा प्रश्‍न यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

ऍबी व्हॅलीच्या जागेसंदर्भात नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी, उच्च न्यायालयाने नेमलेले प्रतिनिधी, वन विभाग, भूमि अभिलेख आणि पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

ऍबी व्हॅलीची एकूण जागा सुमारे 7 हजार एकर आहे. एका एकर जागेची किंमत ही 6 कोटी रुपये इतकी निश्‍चित करण्यात आली आहे. याविषयीही संबधितांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला की, या किंमतीने कोणी जागा घेणार नाही. 6 कोटी रुपये एकरी असलेला दर हा अडीच कोटी रुपये करण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावर प्रशासनाकडून हे दर रेडिरेकनरनुसार असल्याचे सांगण्यात आले. तसेच यातील सुमारे 346 हेक्‍टर जागा वन विभागाची असून ही जागा एकसलग नसून तुकडे-तुकडे स्वरुपात आहे.

इनाम अथवा वतन जमिनींचे हस्तांतरण करताना शासन दरबारी नजराणा भरावा लागतो. त्याची किंमत किती असेल आणि तो कोणी भरायचा. या मंजूर लेआऊटमध्ये ऍमिनिटी स्पेस आहेत. त्या जागा विकासात काही अडथळे येणार नाही, अशी शंका यावेळी उपस्थित करण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)