तेल गळतीमुळे द्रुतगतीवर कोंडी

पिंपरी,  (प्रतिनिधी) – द्रुतगती मार्गावर टॅंकरच्या इंजिनमधून तेल गळती झाल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शनिवारी (दि. 20) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास खंडाळा घाटातील अमृतांजन पूल येथे हा प्रकार घडला.

मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका टॅंकरमधून खंडाळा घाटातील अमृतांजन पूल दरम्यान मोठ्या प्रमाणात तेल रस्त्यावर सांडले. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक रोखून धरण्यात आली. दरम्यान, त्या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि आयआरबीचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. रस्त्यावर सांडलेले तेल हटवण्यासाठी त्यावर माती आणि भुस्सा टाकण्यात आल्या. तसेच, त्यावर वाहने घसरणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. या मार्गावर सुमारे 4 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा होत्या. विकेंट असल्याने सकाळपासूनच द्रुतगतीवर वाहने अधिक होती. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक मंदावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)