तेल खरेदीच्या नावावर 91 लाखाची फसवणूक

पुणे – औषध बनविण्यासाठी आवश्‍यक असलेले तेल खरेदी करण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याची 94 लाख 1 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याला 1 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

समीर शर्मा ऊर्फ सर्फराज अमिरजादा मोहंमद नुरूल्लाह रोमी (30, रा. सांताक्रुझ, मुंबई) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत नितीन शशिकांत शहा (51, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना जुलै 2017 ते 19 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडली. रोमी आणि त्याच्या दोन साथीदारांनी ई-मेल आणि फोन करून औषध बनविण्यासाठी आवश्‍यक असलेले तेल खरेदी करण्याचे आश्‍वासन शहा यांना दाखविले. आरोपींच्या खात्यावर वेळोवेळी 94 लाख 1 हजार रुपये भरण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी रोमी याला अटक करून न्यायालयात हजर केले.

-Ads-

त्यावेळी फसवणुकीच्या रक्‍कमेतील 55 लाख 51 हजार रुपये रोमी याच्या खात्यावर फिर्यादींनी भरले आहेत. ही रक्‍कम जप्त करण्यासाठी तसेच, त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे खाते उघडल्याचे दिसून येत आहे. याबाबत तपास करण्यासाठी या गुन्ह्यात नायजेरीयन आरोपीही सामील असून, आरोपींची अशा प्रकारे फसवणूक करण्याची टोळी आहे. याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)