तेलीसमाज वधु-वर मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

पुणे – संताजी प्रतिष्ठान आणि फौंडेशनच्यावतीने महाराष्ट्रातील तेली समाजातील वधुवर मेळावा नुकताच सृष्टी गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. त्याला समाजबांधवांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी सुमारे पंधराशे विवाह इच्छुक युवक युवती तसेच त्यांचे पालक उपस्थित होते. मेळाव्याचे उद्‌घाटन वाघोलीचे ग्रामपंचायत सदस्य शिवदासजी उबाळे व सरपंच सौ वसुंधराताई उबाळे यांच्या हस्ते झाले.

यावेळी शिवदासजींना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. श्रीधर भोज यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संताजी फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पवार, रामदास धोत्रे, डॉ. राजेंद्र मिटकर, सौरभ तेली, विजयकुमार शिंदे, नितीन शिंदे आदिंनी योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिष देशमाने यांनी केले. रमेश भोज यांनी प्रास्तविक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)