तेलाचे डब्बे सांडल्याने दुचाकी घसरल्या

निगडी – रूपीनगर येथील वंदे मातरम चौकात तेलाचे डबे घेऊन जाणाऱ्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकीसोबत धडक झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल सांडले. यामुळे गजबजलेल्या या रस्त्यावर कित्येक दुचाकीचालक घसरुन पडले. काही दुचाकीचालकांना किरकोळ जखमा ही झाल्या.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब काळोखे, विजय कुंभार व त्यांच्या साथीदारांनी रस्त्यावर थांबून दुचाकीचालकांना सावधनतेचा इशारा केला आणि तेलापासून लांबून जाण्यास सांगितले. तसेच तळवडे येथील अग्निशामक दलास याबाबत माहिती दिली. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी त्वरीत दाखल झाले व रस्त्यावर पडलेले ऑईल पाण्याने धुवून काढले. अधिकारी ज्ञानेश्वर भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक इंगवले, पद्माकर बोरावके, दिनेश हिंगलकर, सुनील फरांदे, शहाजी कोपनर यांनी काम केले. यावेळी परिसरातील कार्यकर्ते किरण गाढवे, मुस्तकिन शेख, आसाराम ढाकणे आदींनी सहकार्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)