विधानसभा बरखास्तीची घोषणा होण्याची शक्‍यता
हैदराबाद – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात विधानसभेची मुदतपुर्व निवडणूक घेण्याचे संकेत दिले आहेत. ते विधानसभा विसर्जीत करण्याची घोषणा करण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. डिसेंबर महिन्यात मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आदि राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्याच वेळी तेलंगणाचीही निवडणूक घेण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे.

दुपारी एक वाजता राज्य मंत्रीमंडळाची बैठक होईल त्यात विधानसभा बरखास्त करण्याचा प्रस्ताव संमत होण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर लगेच पक्षातर्फे एक प्रचंड जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यात ही सभा होणार असून त्यान निवडणुकीची जाहीर घोषणा केली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव व राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री के. टी. रामराम यांनी एका दूरचित्रवाणीवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की मुख्यमंत्री उद्या एक महत्वाची घोषणा करणार आहेत.

तथापी विधानसभा बरखास्त केली जाणार आहे किंवा कसे या विषयी भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. तथापी मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघेल एवढेच ते म्हणाले. राज्यातील विद्यमान सरकारची मुदत मे 2019 अशी आहे. लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच या राज्याची विधानसभेचीही निवडणूक होणे अपेक्षित होते पण पाच महिने आधीच त्यांनी राज्य विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 सप्टेंबर हा पक्षाचा स्थापना दिवस आहे ती संधी साधून पक्षातर्फे ही महत्वाची घोषणा केली जाईल असे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)