तेलंगणात राष्ट्रपती राजवट लागू करा

एकत्रित विरोधकांची राज्यपालांकडे मागणी
हैदराबाद – तेलंगणातील टीआरएस पक्षाच्या विरोधात राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष एकत्र आले असून त्यांनी राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. ही मागणी करणाऱ्या पक्षांमध्ये कॉंग्रेस, तेलगु देसम आणि दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचा समावेश आहे. तेलगु देसम पक्षाची स्थापना झाल्यापासून 35 वर्षांनी प्रथमच या पक्षाने राज्यात कॉंग्रेसशी हातमिळवणी केली आहे.

तेलगु देसम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एल रामा. कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी चंदा व्यंकट रेड्डी, आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी यांनी आम्ही आगामी निवडणुकीत एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे अशी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की आमची याबाबतच्या चर्चेची पहिली फेरी झाली असून त्यात आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील काळजीवाहू सरकारकडून सत्तेचा ताबा काढून घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही त्यांनी राज्यपालांकडे केली आहे.

उत्तमकुमार रेड्डी म्हणाले की राज्यात आम्ही समविचारी पक्षांची व विविध राजकीय संघटनांची एकी करणार असून सर्वच क्षेत्रातील कामगार व कर्मचारी संघटनांनाही आम्ही आमच्या बरोबर घेऊन टीआरएसचा पराभव करण्यास सज्ज आहोत. या महाआघाडीतून भाजपला मात्र दूर ठेवण्यात आले असून सत्तारूढ टीआरएस पक्षाचा मित्र पक्ष असलेल्या एमआयएम पक्षालाही यातून दूर ठेवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)