तेलंगणात भाजपचा प्रचाराचा नारळ फुटणार 15 सप्टेंबरला

हैदराबाद – तेलंगणातील सत्तारूढ तेलंगणा राष्ट्रीय समिती या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पक्षानेही तेथील प्रचारासाठी आता कंबर कसली असून पक्षाने 15 सप्टेंबर रोजी प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. तेथे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून त्यासाठी मेहबुबनगर हे सभेचे स्थान निश्‍चीत करण्यात आले आहे.

भाजपचे स्थानिक नेते एन रामचंद्रराव यांनी सांगितले की आम्ही प्रचाराची पद्धतशीर रणनिती आखत असून राज्याच्या प्रत्येक मतदार संघांमध्ये पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आम्ही राज्यासाठी निवडणूक जाहीरनामा प्रसारीत न करता प्रत्येक मतदार संघासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसारीत करणार आहोत असे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)