तेलंगणात घाटात बस कोसळून 52 ठार

संग्रहित छायाचित्र

हैदराबाद: तेलंगणातील राज्य परिवहन मंडळाची एक बस जगतीयाल जिल्ह्यातील घाटात कोसळून आज झालेल्या अपघातात 52 जण ठार झाले तर अन्य सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमाराला शनिवारपेठ गावाजवळ हा अपघात झाला. बसमध्ये एकूण 70 प्रवासी होंते. त्यापैकी बहुतेक जण अंजनेय स्वामी मंदिराच्या दर्शनाहून परतत होते. त्यावेळीच त्यांच्यावर काळाने हा घाला घातला.

या घटनेबद्दल मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची तातडीची मदत जाहींर केली आहे. या बावन्न जणांमध्ये सहा बालकांचा समावेश आहे. जखमींना योग्य ती वैद्यकीय मदत करण्यासाठी पथके पाठवण्यात आली असून गंभीररित्या जखमी झालेल्यांना हैदराबाद आणि करीमनगर येथील रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. जगतीयालचे जिल्हाधिकारी ए शरत हे या मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत. बसचे ब्रेक घाटातच निकामी झाल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. एका साध्या वळणावरून ही बस थेट घाटात खोल कोसळली. योग्यवेळी ब्रेक लागले नसल्याचे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असावे असेही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)