तेलंगणात कॉंग्रेस मुख्यमंत्रीपदाचा दावेदार घोषित करणार नाही

हैदराबाद – तेलंगणातील विधानसभा निवडणूक प्रचार काळात कॉंग्रेस आपल्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणार नाही. असे त्या पक्षाने स्पष्ट केले आहे. कॉंग्रेसचे तेलंगणाचे निरीक्षक आर. सी. खुंतिया यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की विधानसभा निवडणुकी आधी पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करण्याची कॉंग्रेसची पद्धत नाही.

प्रदेशाध्यक्ष उत्तमकुमार रेड्डी हे पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करतील पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निर्वाचित आमदारांकडूनच निश्‍चीत केला जाईल. या राज्यात कॉंग्रेसने तेलगुदेसम आणि कम्युनिस्ट पक्षांशी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या विधानसभेत कॉंग्रेसला 119 पैकी केवळ 21 जागाच मिळाल्या होत्या तथापी या पक्षाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 25 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)