तेलंगणातील पहिली तृतीयपंथी महिला उमेदवार बेपत्ता

हैद्राबाद – तेलंगणात निवडणूक पहिल्यांदाच एक तृतीयपंथी महिला उमेदवार निवडणूक लढवत आहे. मात्र ही महिला उमेदवार मंगळवारपासून अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रमुखी असे तृतीयपंथी महिला उमेदवाराचे नाव आहे. या प्रकरणाची पोलीस तपास करीत आहेत.

चंद्रमुखी हैद्राबादमधील गोशामहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकेश गौड यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवत आहेत. त्याचबरोबर भाजपाचे टी. राजा आणि टीआरएसचे प्रेमसिंह राठोड हेदेखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. चंद्रमुखी मंगळवारी आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने त्यांच्या मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)