तेलंगणातील निवडणुकीचा सस्पेंन्स कायम

हैदराबाद – तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पक्षाच्या मेळाव्यात विधानसभा बरखास्तीची घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण त्यात त्यांनी ही घोषणा न करता या विषयीचा सस्पेन्स कायम ठेवला. यावेळी बोलतांना त्यांनी दिल्लीतील राजकीय पक्षांशी आपली लढाई असल्याचे घोषित केले. यात त्यांनी भाजपला आपला विरोध असल्याचेही सूचित केले आहे.

50 मिनीटांच्या भाषणात त्यांनी आपल्या सरकारने केलेल्या जनहिताच्या निर्णयाची माहिती देतानाच राष्ट्रीय पक्षांवरही मोठे तोंड सुख घेतले. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय राजकीय पक्षांचे तिकीट वाटप दिल्लीत होते त्यासाठी लोकांना स्वाभीमान गहाण ठेवावा लागतो आणि मोठ्या नेत्यांची चमचेगीरी करावी लागते असे नमूद करून तेलंगणाचा स्वाभीमान कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले पण त्यांनी निवडणुकांविषयी मात्र काही वाच्यता केली नाही. ते या मेळाव्यात विधानसभा बरखास्तीची घोषणा करतील असे सांगितले गेले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)