तेलंगणमध्ये व्यापक आघाडी बनवण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील

हैदराबाद – तेलंगणमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी व्यापक आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने कॉंग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी भाकप आणि तेलगू देसम पक्षाशी (टीडीपी) कॉंग्रेसने संपर्क साधला आहे.

तेलंगणमध्ये पुढील वर्षी लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणूक होणार होती. मात्र, तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) सरकारने मागील आठवड्यात विधानसभा बरखास्तीची शिफारस केली. त्यामुळे त्या राज्यात लवकरच मुदतपूर्व निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीत सत्तारूढ टीआरएसचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून कॉंग्रेसकडे पाहिले जात आहे. आता टीआरएसशी ताकदीने दोन हात करण्यासाठी तेलंगणमधील विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत.

आतापर्यंत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी हा कॉंग्रेसचा कट्टर प्रतिस्पर्धी मानला जात होता. मात्र, टीडीपीने भाजपबरोबरचे संबंध तोडल्याने कॉंग्रेसने तेलंगणपुरते त्या पक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न चालवला आहे. तेलंगणमध्ये व्यापक आघाडी स्थापन करण्याच्या उद्देशाने विरोधकांमध्ये प्राथमिक चर्चा सुरू झाल्याचे समजते. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडी स्थापन झाल्यास ती टीआरएसपुढे मोठे आव्हान उभी करू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)