तेरा वर्षांनी दहावीचा वर्ग भरला!

  • माजी विद्यार्थी मेळावा : शाळा, शिक्षक, मित्र-मैत्रिणी भेटले

पवना नगर (वार्ताहर) – पवना विद्या मंदिरच्या 2004-2005 शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता. विद्येची देवता सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन यावेळी करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. तेव्हाचे शिक्षक आणि आत्ताच्या सर्व शिक्षकांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी थोडसे वेगळेपण दिसले. “निसर्ग जगला, तर आपण जगू’ हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. सत्कारात मृत्युंजय कादंबरी भेट देण्यात आली. शाळेस भिंतीवरील घड्याळ देण्यात आले. जुन्या आठवणींना उजाळा देत असताना विद्यार्थी, शिक्षकांचे यावेळी मन भरून आले. ज्येष्ठ अध्यापक तांबे, धनवे, ठाकर, वंजारे, मुख्याध्यापिका जंगले बाई, थोरात, विद्यार्थ्यांमध्ये विठ्ठल पडवळ, प्रदीप ठाकर, आशुतोष घाडगे, मालती जाधव यांनी मनोगत व्यक्‍त केले.

-Ads-

धर्मेंद्र ठाकर यांनी प्रास्ताविक, सचिन मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. अमोल कालेकर यांनी आभार मानले. निवृत्त मुख्याध्यापक शेख, बारवकर, भालेराव, नवले, कांबळे, गुर्जर बाई, मखर उपस्थित होते. भगवान सावंत, नारायण ठाकर, बाळासाहेब शिंदे, रवींद्र गायकवाड, प्रदीप साबळे, प्रदीप मालुसरे, संदेश देवरुखकर, मनीषा काळे, पुनम काळे, निर्मला डोंगरे व सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)