तेरा टीमकडून होणार रूबेला व गोवर लसीकरण

इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाची शाळाबाह्य मुलांना दिली जाणार लस

रेडा- इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वतीने गोवर व रूबेला लसीकरण मोहिम दि. 27 नोव्हेंबर ते दि. 31 डिसेंबर या कालावधीत 9 हजार 640 लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. 16 शाळा व 31 अंगणवाड्या या ठिकाणी ही मोहीम तब्बल 13 टीमकडून राबविण्याचे नियोजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली.
डॉ. राजेश मोरे म्हणाले की, रूबेला व गोवर ही लस बालकांना आवश्‍यक आहे. जर रूबेला लसीकरण योग्य वेळेत करून घेतले तर शरीराला व्यंगपणा येणार
नाही. बहिरेपणा, लुळेपणा, आंधळेपणा, इतर व्यंग आयुष्यभर टाळण्यासाठी पालकांनी या लसीकरणाचा फायदा घेणे गरजेचे आहे. इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने गोवर व रूबेला लसीकरण मोहीम फत्ते करण्यासाठी 5 लोकांची एक टीम याप्रमाणे 13 टीमचे नियोजन केले आहे. या प्रत्येक टीमवर वॉच ठेवण्यासाठी एक वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे.
शाळेत असणाऱ्या मुलांना सकाळी 9 ते 5 या वेळेत हे लसीकरण करण्यात येईल. शाळेत शिक्षण घेत नसणाऱ्या मुलांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस 9 महिन्याच्या कालावधीत बालकांपासून ते 15 वर्षापर्यंत लस घेता येते. मात्र, ही लस घेत असताना उपाशीपोटी घेऊ नये, असे आवाहन डॉ. मोरे यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)