तेजस हे भविष्याचा वेध घेणारे विमान

हवाईदलाचे प्रमुख धनोआ यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली – पाकिस्तानचे जेएफ-17 हे आजचे लढाऊ विमान असले तरी भारताकडे असलेले तेजस हे भविष्याचा वेध घेणारे विमान आहे असे लष्कर प्रमुख बी. एस. धनोआ यांनी म्हटले आहे. तेजस हे भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाने विकासित केलेले हलके लढाऊ विमान आहे. तर चीन आणि पाकिस्तान यांनी संयुक्तपणे जेएफ 17 हे सिंगल इंजिन असलेले हलके लढाऊ विमान विकसित केले आहे. या दोन्ही विमानांची तुलना करताना धनोआ यांनी वरील प्रतिपादन केले. ते म्हणाले की पाकिस्तानी विमानापेक्षा भारताचे तेजस हे विमान अनेक अंगानी सरस आहे.

पाकिस्तानचे विमान तेजस इतके आधुनिक नाही. त्यात अनेक उपयुक्त सुविधा आहेत असेही त्यांनी नमूद केले. तेजस हे विमान भारत सरकारच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स विमान कंपनीत तयार करण्यात आलेले विमान असून ते जुलै 2016 मध्ये भारतीय हवाईदलात समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय हवाईदलाच्या गगनशक्ती या प्रदर्शनात तेजस या विमानाचा समावेश केला जाणार आहे. याच महिन्यात हे प्रदर्शन आणि विमानांचे प्रात्यक्षिक हवाईदलाने आयोजित केले आहे.

तेजस मध्ये सुरूवातीला काही अडचणी आल्या का असे विचारता त्याला होकरात्मक उत्तर देताना ते म्हणाले की उष्ण वातावरणामुळे या विमानाला सुरूवातीला काही मर्यादा आल्या परंतु हिंदुस्तान एरोनॉटिक्‍सच्या तंत्रज्ञांनी त्यात सहा तासात दुरूस्ती केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तेजसची तुलना फ्रांसच्या राफेल विमानांशी केली जाऊ शकते काय असे पत्रकारांनी त्यांना विचारले असता धनोआ म्हणाले की प्रत्येक लढाऊ विमानांची क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे अशी तुलना करणे योग्य होणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)