तेजस सिनगरची संशोधनासाठी फ्रान्सला निवड 

कोपरगाव – कोपरगाव तालुक्‍यातील भोजडे गावातील ग्रामीण भागातून शिक्षण घेतलेल्या तेजस परसराम सिनगर याची फ्रान्स येथे “उणे शून्य अंश सेल्शिअस’ तापमानावर संशोधन (भौतिकशास्त्र) करण्यासाठी विशेष निवड करण्यात आली आहे.
तेजस सिनगर हा सद्या मुंबई येथे सीबीएससी पॅटर्नच्या भौतिकशास्त्र विषयातून एमएससीच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. तेजेसची 5 व्या सत्रासाठी इन्स्टिट्युट निल, नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च, फ्रान्स येथे निवड झाली आहे. निवड झालेल्या पैकी राज्यातला तो एकमेव विद्यार्थी आहे. त्याचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. तेजस हा कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव परसराम सिनगर यांचा मुलगा आहे. शेतकरी पार्श्‍वभूमी असलेल्या तेजसने प्राथमिक शिक्षण भोजडे येथे करून पुढील शिक्षण नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्‍वर येथे पूर्ण केले. “नॅशनल स्क्रिनिंग टेस्ट’ परिक्षेद्वारे देशभरातून 135 विद्यार्थी निवडले जातात. त्यामध्ये तेजस सिनगर हा 18 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
या यशाबद्दल त्याचे आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, शिवसेना कोषाध्यक्ष बाळासाहेब सिनगर यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)