तेजस्वी सातपुते नव्या पोलीस अधीक्षक

पंकज देशमुखांची पुण्याला बदली;  सातपुते गुरूवारी होणार हजर

सातारा,दि.25(प्रतिनिधी)
राज्य गृह विभागाने राज्यातील भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात पुण्यातील वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे शहर पोलीस दलात उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंकज देशमुख यांनी अल्पावधीतच सातारा जिल्हा पोलीस दलाला मोठी शिस्त लावण्याचे काम केले. त्यांच्या काळात पोलीसांचे ड्रीम स्वप्न असलेल्या पोलीस वसाहतीच्या बांधकामाला सुरूवात झाली. तसेच त्यांनी सातारा शहरासह जिल्ह्यातील गणेश विसर्जन मिरवणूक या डॉल्बीमुक्त करण्यासाठी राजकीय दबाव झुगारून प्रयत्न केले होते. उत्कृष्ठ प्रशासक म्हणून त्यांचा पोलीस दलात दबदबा निर्माण होता. त्यांनी कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी तसेच पोलीस व सामान्य जनता यांचे संबंध चांगले राखण्यासाठी लक्षणीय प्रयत्न केले होते.

तसेच नव्याने दाखल होणाऱ्या तेजस्वी सातपुते या सन 2012 च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून त्यांनीही यापुर्वी चांगली सेवा बजावली आहे. पुणे शहरातील हेल्मेट सक्तीला होणारा विरोध त्यांनी त्यांच्या कौशल्याने हाताळत, हेल्मेटचे फायदे पुणेकरांना पटवुन दिले होते.

त्यानंतर राज्यातील पहिली ई-चलन प्रणाली त्यांनी पुणे येथे राबवली. पुणे शहरातील वाहतूक कोंडीला पर्याय म्हणून त्यांनी तात्पुरती सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखण्याचा उपक्रम राबवले. पुणे ग्रामीण पोलीस दलातही त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. शिस्तप्रिय असलेल्या सातपुते यांनी साताऱ्याच्या भुमित गुन्हेगारीची पाळेमुळे नष्ट करणार असल्याचा विश्‍वास प्रभात’शी बोलताना व्यक्त केला.

———————————————————————————————–
कोण आहेत तेजस्वी सातपुते
तेजस्वी सातपुते या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव ता.नेवासा येथील उच्चशिक्षीत घरातील आहेत. त्यांचे शिक्षण बी.एससी पर्यंत बारामती येथे झाले आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व त्यात त्या सन 2012 साली आयपीएस झाल्या. त्यांची आई आदर्श शिक्षक पुस्कार प्राप्त शिक्षीका असून वडीलांचा शेवगाव येथे व्यवसाय आहे. तर लहान बहीण सीए आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)