तेजस्विनी सावंतचे कोल्हापुरात मोठ्या जल्लोषात स्वागत

कोल्हापूर : ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्य अशा दोन पदकांची मानकरी ठरलेली नेमबाज तेजस्विनी सावंतचे कोल्हापुरात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

गोल्ड कोस्टहून आधी पुण्यात आणि मग तिथून तेजस्विनी कोल्हापुरात दाखल झाली. तेजस्विनी आणि तिचे पती समीर दरेकर यांचे औक्षण करण्यात आले. मग समीर दरेकर यांनी तेजस्विनीला मिठाई भरवून तिचे अभिनंदन केले. त्यावेळी तेजस्विनीच्या आई सुनीता सावंतही उपस्थित होत्या.

-Ads-

तेजस्विनीने आपल्या कुटुंबीयाच्या आणि चाहत्यांच्या साक्षीने दोन्ही पदकांसह फोटोला पोज दिली. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे कौतुक केले. कोल्हापूरच्या वर्षा नगर भागात फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला. देशाला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या तेजस्विनीच्या आगमनाने कोल्हापुरात आनंदाचे वातावरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)