‘तेजस्विनी’ बससेवेचे दोन मार्ग गुंडाळले

निगडी-हिंजवडी, भोसरी-कात्रज मार्गाचा समावेश

पुणे – जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी पीएमपीकडून सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बसेसचे दोन मार्ग प्रशासनाकडून बंद करण्यात आले आहे. यानुसार निगडी-हिंजवडी फेज 3 आणि भोसरी-कात्रज हे दोन तेजस्विनी मार्ग बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे सद्यस्थितीत शहरात केवळ 9 मार्गावर तेजस्विनी बसेस धावत आहेत. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या या बसेस काही महिन्यांतच ढेपाळल्या आहेत.

सध्या शहरातील 11 मार्गांवर 32 बसेसमार्फत “तेजस्विनी’ची सेवा दिली जात आहे. या मार्गांवर दररोज 236 फेऱ्या होत आहेत. दररोज सरासरी 8 हजार महिला तेजस्विनीतून प्रवास करतात. पीएमपी प्रशासनाने “तेजस्विनी’ची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करुन दिल्याने प्रवासी संख्येत भर पडली आहे. याला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पीएमपी प्रशासनाकडून निगडी-दापोडी बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला. यामुळे या बीआरटी मार्गावरून दोन्ही बाजूला दरवाजा असलेल्या बीआरटी बसेस जाऊ शकतात. मात्र, तेजस्विनी बसेस बीआरटी मार्गातून धावू शकत नसल्याने या मार्गावरुन जाणाऱ्या निगडी- हिंजवडी फेज 3 आणि भोसरी-कात्रज हे दोन मार्ग बंद करण्यात आले आहेत. या दोन मार्गावर तेजस्विनीच्या दिवसभरात 6 गाड्यांच्या माध्यमातून एकूण 60 फेऱ्या केल्या जात होत्या. दरम्यान, बीआरटी मार्गावर जादा बसेस सुुरू असून महिला प्रवाशांना कुठलीही अडचण येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

काही महत्त्वाचे मार्ग
स्वारगेट-वडगाव धायरी
मनपा-वारजे माळवाडी
शिवाजीनगर-कात्रज
हडपसर-वारजे माळवाडी

बंद करण्यात आलेले मार्ग
निगडी ते हिंजवडी फेज 3 मार्ग क्रमांक 372
भोसरी ते कात्रज मार्ग क्रमांक 299
सद्यस्थितीत सुरू असलेले मार्ग- 9


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)