तेजस्विनीची सुर्वण कामगिरी; कोल्हापुरात जल्‍लोष

कोल्हापूर- ऑस्ट्रेलियामधील गोल्ड कोस्ट इथल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट सुरूच ठेवली आहे. या स्पर्धेत कोल्हापूरची सुवर्ण कन्या तेजस्विनी सावंत हिने आज नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेतला. 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात तिने हे यश संपादन केले. या यशाबद्दल क्रीडानगरी कोल्हापुरात जल्लोष करण्यात आला. ती राहत असणार्‍या एस.एस.सी. बोर्ड परिसरातील घरासमोर क्रीडाप्रेमींनी  तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत, पती समीर दरेकर यांच्यासह कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. फटाके वाजवून साखर-पेढे वाटण्यात आले तेजस्विनीसह कोल्हापूर-महाराष्ट्र आणि देश गौरवाच्या घोषणा देत तिरंगा ध्वजही फडकवण्यात आला.

तेजस्विनीच्या यशाची  माहिती मिळताच शहरात ठिकठिकाणी असणार्‍या नेमबाजी प्रशिक्षण केंद्रात (शूटिंग रेंज) नवोदित नेमबाजांनी जल्लोष करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शाहू स्टेडियमवर श्री नेताजी तरुण मंडळ व केएसडीआय आयोजित ‘अटल चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या दरम्यान तेजस्विानीचे आवर्जून कौतुक करण्यात आले. सोशल मीडियावरही तेजस्विनीवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. तेजूकडून अशीच देशसेवा घडावी तेजस्विनीने तीन राष्ट्रकुल स्पर्धा खेळल्या आहेत. यापैकी एकाही स्पर्धेत तिला अपयश आले नाही. प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पदक  पटकावले .याशिवाय इतर स्पर्धांतही पदकांची कमाई सुरूच ठेवली. तेजूच्या हातून भविष्यातही अशीच देशसेवा घडावी, अशी अपेक्षा तेजस्विनीच्या आई सुनीता सावंत यांनी व्यक्‍त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)