तृप्ती देसाई यांना पोलिसांनी बजावली नोटीस

 डॉ. अजय चंदनवाले यांना काळे फासण्याची धमकी दिलेले प्रकरण

पुणे : बी. जे. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून त्यांना काळे फासण्याची धमकी दिल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना गुरुवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ. चंदनवाले यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन सोडण्यात आले.
 डॉ. चंदनवाले यांनी राज्य सरकारकडे सादर केलेले त्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) त्या वेळी दिलेल्या जाहिरातीमधील निकषांचे उल्लंघन करणारे आहे, असे सांगत त्यांनी एमपीएससी आणि राज्य सरकारची सात वर्षे फसवणूक केल्याचा आरोप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच, डॉ. चंदनवाले यांना काळे फासण्याचा इशाराही दिला होता, त्यामुळे डॉ. चंदनवाले यांनी देसाई यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता देसाई यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन सोडण्यात आले. एमपीएससीच्या निकषांनुसार डॉ. चंदनवाले यांच्या हाताचे अपंगत्व ४० टक्‍क्‍यांच्या वर नाही, ते केवळ १८ टक्के आहे. त्यांनी सरकारची फसवणूक केली. त्यांच्या हाताच्या अपंगत्वाची १५ दिवसांत तपासणी करून हा अहवाल तत्काळ जाहीर करावा, अन्यथा काळे फासण्याची भूमिका आम्ही कायम ठेवणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

या पार्श्‍वभूमीवर बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता देसाई यांना त्यांच्या घरातून अटक केली. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस देऊन सोडण्यात आले. एमपीएससीच्या निकषांनुसार डॉ. चंदनवाले यांच्या हाताचे अपंगत्व 40 टक्‍क्‍यांच्या वर नाही, ते 18 टक्के आहे. असे असूनही त्यांनी सरकारची फसवणूक केली. त्यांच्या हाताच्या अपंगत्वाची 15 दिवसांत तपासणी करून हा अहवाल तत्काळ जाहीर करावा, अन्यथा काळे फासण्याची भूमिका कायम ठेवू, असे देसाई यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)