तृप्ती देसाईसह चौघांचा अटकपूर्व न्यायालयाने फेटाळला

पुणे, दि. 17 (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण तसेच जातीवाचक टिपण्णी केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांसह इतर चार जणांचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. के. पाटील यांनी हा आदेश दिला.
तृप्ती देसाई यांसह त्यांचे पती प्रशांत नारायण देसाई, दीर सतिश नारायण देसाई आणि भुमाता ब्रिगेड संघटनेचे कार्याध्यक्ष कांतीलाल ऊर्फ अण्णा गवारे अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विजय अण्णा मकासरे (वय 33, रा. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. 27 जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बालेवाडी स्टेडीयम येथील महामार्गावर ही घटना घडली. तृप्ती देसाई यांसह इतर चार जणांनी फिर्यादी यांना मारहाण करून त्यांच्याकडील 2 मोबाईल, सोन्याची चैन आणि 2 हजार रुपये असा एकूण 27 हजारांचा ऐवज लुटला. जातीय वाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बचाव पक्षातर्फे ऍड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आला. या अर्जास अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी विरोध केला. अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंध कायदा 1989 मधील कलम 18 नुसार आरोपीविरुध्द काही आरोप असतील तर त्याला जामीन देता येत नसल्याचा युक्तिवाद घोगरे पाटील यांनी केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने चौघांचा अटकपूर्व जामिन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)