तृतीय पंथींना अर्थसहाय्य देण्यात यावे

महिला व बालकल्याण समितीसमोर नगरसेविका रूपाली धाडवे यांचा प्रस्ताव

पुणे – शहरातील तृतीय पंथींना रोजगाराचे हक्‍कांचे साधन नसल्याने त्यांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा समाना करावा लागतो. तसेच रस्त्यावर फिरून अर्थाजन करावे लागते. त्यामुळे त्यांना सन्मानाने जगात यावे, या उद्देशाने त्यांना महापालिकेकडून अर्थसाह्य देण्यात यावे. तसेच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या शहरी गरीब योजनेअंतर्गत त्यांनाही वैद्यकीय उपचाराचा लाभ मिळावा, असा प्रस्ताव महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समिती समोर ठेवण्यात आला आहे.

-Ads-

नगरसेविका रूपाली धाडवे यांनी या प्रस्ताव दिला असून समितीकडून हा प्रस्ताव प्रशासनाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, शहरात सुमारे 20 ते 25 हजार तृतीय पंथीची संख्या असून त्यांना या प्रस्तावाचा लाभ मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील तृतीय पंथी नागरिकांची संख्या वाढली आहे. परंतु, आजही सर्वसामान्य नागरिक म्हणून समाजात सामावून घेतले जात नाही. अनेकदा त्यांना हीनतेची वागणूक दिली जाते. यामुळे कोणत्याही स्वरुपांच्या रोजगारांच्या संधी उपलब्ध नाहीत. तर, काही वृद्ध तृतीय पंथींची परिस्थिती अधिकच गंभीर स्वरुपांची आहे.

या पार्श्वभूमीवर शहरातील तृतीय पंथींना अर्थसहाय्य योजनेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव नगरसेविका रुपाली धावडे यांनी महिला व बालकल्याण समितीच्या समोर ठेवला होता. महापालिकेच्या समाजातील विविध घटकांतील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये विधवा, अपंग, विद्यार्थी आदी घटकांकरीता आर्थिक सहाय्य, आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात. याप्रमाणेच तृतीय पंथी नागरिकांना एक रकमी अथवा प्रति महिना अनुदान स्वरुपात अर्थिक मदत करण्यात यावी, तसचे महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेतदेखील सामावून घ्यावे, असा प्रस्ताव देण्यात नमूद करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा राजश्री नवले यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)