तृतीयपंथी, दिव्यांगांसाठी कृती आराखडा

पिंपरी – शहरातील वंचित असलेले तृतीयपंथी, दिव्यांग व गरीब व्यक्‍तिंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वसामावेशक कृती आराखडा तयार केला जाणार आहे. याकरिता 20 लाख रुपये खर्च येणार असून, स्थायी समितीच्या मान्यतेकरिता हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

तृतीयपंथीयांचे अस्तित्व मान्य करुन, त्यांना माणूस जगण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता त्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. मतदार यादीत खास या घटकासाठी तिसरा पर्याय उपलब्ध करुन देत, त्यांची मतदार यादीत अण्य अशी नोंद केली जात आहे. आतापर्यंत अन्य राज्यात एक तृतीयपंथी आमदार, न्यायाधीश ही पदे भूषवत आहेत. याशिवाय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातील एका ग्रामपंचायतीचे सरपंचपद तृथीयपंथी व्यक्‍ती भूषवत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक तृतीयपंथीयांचे वास्तव्य आहे. त्यांना समाजाच्या वाईट नजरांबरोबरच हालअपेष्टा सहन करत जीवन जगावे लागत आहे. या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाच्या अपंग कल्याणकारी योजना लेखाशिर्षावर 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता 20 लाख रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. या कामाकरिता 19 लाख 32 हजार रुपये खर्च येणार आहे. त्याकरिता समाजिक कार्यकर्ते समीर घोष यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्‍ती करण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे. शहरातील तृथीयपंथीयांबरोबरच दिव्यांग व गरीब व्यक्‍तींसाठी देखील या तरतुदीमधून खर्च केला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)