तृतीयपंथियांचे साहित्य कोसो दूरच!

– कल्याणी वाघमारे

पुणे – आपल्या समाजामध्ये तृतीयपंथी व्यक्ती जन्माला येणेच पाप समजले जाते. व्यक्ती जन्माला आल्यानंतर जन्मदाते ते समाज यांच्यासोबत सतत संघर्ष करत या व्यक्ती आपल्या जगण्याचा मार्ग शोधत असतात. आजही आपल्या समाजामध्ये तृतीयपंथी व्यक्तींना माणूस म्हणून वागवले जात नाही. ज्यांना अजूनही जगण्याच्या संघर्ष करावा लागत आहे. असे साहित्य, लेखनापासून तर कोसो दूरच आहे.

तृतीयपंथीयांच्या समस्या, अडचणी आणि व्यथा सांगणारे चित्रपट, लघुपट, लेख आदी येऊन गेले आहेत. मात्र त्याच्या या व्यथा मांडायला लेस्बियन-गे (समलिंगी), तृतीयपंथी, बायसेक्‍शुअल (उभयलिंगी), इंटरसेक्‍स या घटकांना त्यांचे विचार, वेदना, आशा-आकांक्षा आणि जगणे समाजापर्यंत पोहोचविताच येत नाही. समाजात वर्षानुवर्षे असलेली त्यांची प्रतिमा तशीच एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे समज-गैरसमजांच्या रूपाने सरकवली जाते. कोणाचे जगणे मांडायचे झाल्यास त्याला आधार मिळत नाही. सध्या या समूहातील अनेक जण विविध ब्लॉगच्या माध्यमातून लिहीत आहेत. अनेक जण कविता करतात, त्याचे सादरीकरणही करतात. अनेक जणांची पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. काही प्रकाशकांनी हे धाडस दाखविले आहे. मात्र, हे साहित्य हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतच आहे.

तृतीयपंथीयांच्या लेखणीला दिशा पिंकी शेख यांनी उभारणी दिली. आपल्या कवितेतून, लेखांमधून तृतीयपंथियांच्या व्यथा, वेदना लेखणीतून मांडल्या त्याच्या या लेखणामुळे तृतीयपंथीतील एक नवी साहित्यिक समोर आली. दिशाने अनेक कवि संमेलन, साहित्य संमेलन, चर्चासत्र यात सहभाग घेत तृतीयपंथियांच्या साहित्याला एक दिशा दिली. मात्र तरीही तृतीयपंथियांच्या साहित्याला समाज, वाचकांकडून हवा तेवढा प्रतिसाद, प्रोत्साहन मिळत नसल्याची व्यथा पंथिय नेहमीच मांडतात. पण, त्यांचा आवाज आपल्या पांढरपेशी समाजापर्यंत पोहचत नाही. मानवी जीव असलेला मात्र केवळ लिंगातील भेदामुळे त्या व्यक्तीकडे पाहण्याची दृष्टी जशी बदलते तसेच त्याचे विचार, जीवन याबाबत पूर्वग्रहदुषित आसल्याने त्यांचे साहित्य ही वाचकांकडून दुर्लक्षित केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)