तृणमूल कॉंग्रेसचे खासदार बंडोपाध्याय यांना सशर्त जामीन

कटक –ओरिसा उच्च न्यायालयाने आज तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना सशर्त जामीन मंजूर केला. चिट फंड घोटाळ्याच्या संदर्भात त्यांना अटक करण्यात आली होती.
बंडोपाध्याय आजारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिल्याने न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. अर्थात, बंडोपाध्याय यांना कुठल्याही राष्ट्रीयीकृत बॅंकेत 25 लाख रूपये जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पासपोर्ट जमा करण्याच्या आणि तपासकामी सहकार्य करण्याच्या अटीही त्यांना घालण्यात आल्या. तब्बल 17 हजार कोटी रूपयांच्या रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्याच्या संदर्भात बंडोपाध्याय यांना 3 जानेवारीला अटक करण्यात आली. सीबीआयने ही कारवाई केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सीबीआयने याप्रकरणी तपास हाती घेतला आहे. याप्रकरणी तृणमूलचे आणखी एक खासदार तपस पाल यांनाही अटक करण्यात आली आहे. बंडोपाध्याय आणि पाल हे दोघेही तृणमूल सत्तेवर असणाऱ्या पश्‍चिम बंगालमधील आहेत. दरम्यान, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी बंडोपाध्याय यांना जामीन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)