तृणमूलच्या शिष्टमंडळाला आसाममध्ये जाण्यापासून रोखले

सिल्चर (आसाम) – आसाममध्ये जाण्यास निघालेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला विमानतळावरच अडवण्यात आले. नागरिकांच्या नोंदणी प्रकरणी तथ्य तपासायला हे शिष्टमंडळ आसाममध्ये येत होते. तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सुखेंदू सेखर रॉय यांनी वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. तृणमूलच्या पथकामुळे आसाममधील परिस्थिती बिघडेल, असे कारण देऊन पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला विमानतळावरच अडवल्याचे रॉय यांनी सांगितले.

तृणमूलच्या या शिष्टमंडळामह्ये 6 खासदारांचा समावेश आहे. यासर्वांना काचर जिल्ह्यातील कुंभिग्राम विमानतळावरील व्हीआयपी कक्षामध्येच ठेवण्यात आले आहे. काचर जिल्हा प्रशासनाने या परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून “एनआरसी’ प्रक्रियेमध्ये सहभागी नसलेल्या कोणाही व्यक्‍तीला जिल्ह्यामध्ये प्रवेश देणे थांबवले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या आदेशावरून तृणमूल कॉंग्रेसचे शिष्टमंडळ आसाममधील प्रत्यक्ष स्थितीची पहाणी करण्यासाठी तेथे गेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार “एनआरसी’च्या मुद्दयावरून मतपेढीचे राजकारण करत आहे, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. भारतीय नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या भूमीमध्येच शरणार्थी बनवले जात आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)