तृणमूलच्या आसाम प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा

गोवाहटी – “एनआरसी’च्या मुद्दयावरून तृणमूल कॉंग्रेसने घेतलेल्या भूमिकेवरून नाराज होऊन आसाममधील तृणमूल प्रदेशाध्यक्ष द्विपेन पाठक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पाठक यांच्याबरोबर तृणमूलच्या आसाममधील प्रदेश कार्यकारिणीनेच आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.

पाठक हे 2011 ते 2016 साठी आसाममधील हाजो मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. आसाममधून बंगाली भाषिकांना हुसकावून काढण्यासाठी “एनआरसी’चा वापर केला जात असल्याचे ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे. ,मात्र आसाममध्ये दीर्घकाळापासून होत असलेल्या घुसखोरीविरोधात आसामींनी केलेल्या संघर्षाचे फलित म्हणजेच “एनआरसी’आहे. आसामची प्रतिमा मलिन करण्याचा कोणाचाही प्रयत्न आपण सहन करणार नाही, असे द्विपेन पाठक म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसचे अस्तित्व जपण्यासाठीच ममता बॅनर्जी आसामला “बळीचा बकरा’ बनवू पहात आहेत. असे असताना ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या पदावर राहण्यास आपल्याला कोणताही नैतिक अधिकार नाही, असे ते म्हणाले. पश्‍चिम बंगालमधून आलेल्या 8 सदस्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. या शिष्टमंडळाने येण्यापूर्वी आपल्याशी चर्चा केली नव्हती. अन्यथा आपण त्यांना तसे काहीही न करण्याचा सल्ला दिला असता, असेही पाठक म्हणाले.

आसामधील पूराच्यावेळी ममता बॅनर्जींना येण्याबाबत सुचवले होते. तेंव्हा त्या का आल्या नाहीत. मग आता तृणमूलचे लोक कशाला येत आहेत, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)