तूर खरेदीच्या रकमेबाबत सदाभाऊ खोत यांनी दिले आश्वासन

मुंबई : तूर खरेदीचे ५०० कोटी रूपये लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यात एकूण १८९ तूर विक्री केंद्र असल्याचे खोत म्हणाले. तुरीच्या एकूण रकमेपैकी सुमारे २०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम नाफेड कडून घेऊन टप्प्याटप्याने देण्यात येणार आहेत.  तूर खरेदीची मुदत १८ एप्रिलपर्यंत असून २२ मार्चपर्यंत २ लाख ५७ हजार २०५ शेतक-यांनी नोंदणी केली असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच १ लाख २४ हजार ६६६ शेतकऱ्यांकडून १५ लाख २३ हजार १५७ क्विंटल तूर खरेदी २२ मार्चपर्यंत करण्यात आल्याचेही ते म्हणाले. यासाठी ८३० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून ३३ कोटी २९ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)