तूप खरेदीप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव द्या

शिर्डी – साईबाबा संस्थानच्या तूप खरेदीत पुरवठादाराने काही विश्वस्त व अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची एसआयटीमार्फत तातडीने चौकशी करण्याचा प्रस्ताव साईबाबा संस्थान व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्र्यांकडे पाठवावा अन्यथा सर्वच विश्वस्त, अधिकारी व संबंधित पुरवठादार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी संस्थानला दिला आहे.

दरम्यान, हरियाना येथील एका तुपाच्या पुरवठादाराने टेंडरपोटी काही विश्वस्त व अधिकाऱ्यांना लाखो रुपयांची लाच दिल्याचे 8 डिसेंबर रोजी व्यवस्थापनाच्या बैठकीत सांगितले. आपणाकडे याबाबतचे पुरावे असल्याचेही त्याने पत्राद्वारे कळवल्याचेही समजते. याशिवाय खासदार सदाशिव लोखंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन तूप खरेदीत विश्वस्त व अधिकाऱ्यांना लाखो रुपये दिल्याचा आरोप करत सीआयडी चौकशीची मागणी केली. मात्र, या प्रकरणावर कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. हे प्रकरण आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार, लाचखोरीचे असून यात साईबाबा संस्थानचे विश्वस्त व वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचे आरोप होत असल्याने या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठवावा. त्याचप्रमाणे दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे अन्यथा सर्व विश्वस्त, वरिष्ठ अधिकारी व संबंधित पुरवठादार यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे. साईबाबा संस्थानचा बुंदी लाडुचा प्रसाद भाविकांमध्ये लोकप्रिय आहे. तो दर्जेदार स्वरूपाचा असावा यासाठी कुलकर्णी यांनी यापूर्वी उच्च न्यायालयातही दाद मागितलेली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)