तूट आटोक्‍यात ठेवण्याची गरज: रघुराम राजन

रुपया घसरण्याची चिंता नको 

भारताचा सध्याचा विकासदर आणखी वाढविण्याची आवश्‍यकता

नवी दिल्ली: सध्या रुपयाचे मूल्य केवळ डॉलर वधारत असल्यामुळे कमी झाल्याचे भासत आहे. त्यावर भारताने जास्त चिंता करण्याची गरज नाही. भारताने तूर्त स्थूल अर्थव्यवस्था बळकट करण्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यानी सांगितले आहे. त्याचा एक भाग म्हणून सरकारने चालू खात्यावरील तूट कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

ते म्हणाले की, सरकारने वित्तीय तूट कमी करण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात सरकारची तूट बरीच कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, चालू खात्यावरील तूट आणखी कमी करण्याची गरज आहे. भारतात या वर्षात निवडणुका होणार आहेत. या काळात सरकारने आर्थिक शिस्त न सोडण्याचे आवाहन त्यांनी केले. यूपीए सरकारच्या काळातील विकासदर मोदी सरकारपेक्षा जास्त होता याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याबाबत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर बोलताना ते म्हणाले की, आता पूर्वीच्या बाबीवर जास्त विचार करू नये. सध्या भारताचा विकासदर 7.5 टक्‍के आहे. तो आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 2008 मध्ये विविध देशांनी आणि त्या देशातील बॅंकांनी आर्थिक शिस्त सोडली होती. त्यामुळे जागतिक आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला होता. यातून या देशांनी धडा घेतला असल्याचे दिसत नाही. कारण आताही तशीच परिस्थिती निर्माण होऊ लागली असल्याचे त्यांनी सागींतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)